पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतला, तेव्हा नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर आता 2000 च्या नोटाही चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नोटा बदलाची प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता या नोटा बदलाच्या प्रक्रियेला अवघे 4 दिवसच उरले आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे 2 हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्या तात्काळ बदलून घ्याव्यात. कारण नंतर या सर्व नोटा बाद होणार आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे 2 हजारांच्या नोटा आहेत, त्या त्यांनी तात्काळ बदलून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिलेल्या मुदतीत म्हणजेच 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या किंवा जमा केल्या नाहीत तर आणखी समस्या वाढू शकतात, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. अजूनही 2000 रुपयांच्या ब-याच नोटा जमा होणे बाकी आहे. अर्थात, तब्बल 24 हजार कोटी रुपयांच्या नोटा बँकेत परत येणे बाकी आहे. रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या 3.62 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. ज्या 19 मे 2023 रोजी 3.56 लाख कोटी रुपयांवर आल्या होत्या.
Edited By - Ratnadeep ranshoor