rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानचा पुन्हा नियंत्रण रेषेवर गोळीबारजम्मू-श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट बारामुल्लामध्ये ड्रोन हल्ला

drone destroyed by indian army
, शनिवार, 10 मे 2025 (21:26 IST)
पाकिस्तान श्रीनगर, राजौरी, पूंछ, अखनूरसह जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात सतत हल्ले करत आहे. तथापि, आपले सैन्य पाकिस्तानला योग्य उत्तर देत आहे. पाकिस्तान नापाक कारवाया करण्यापासून थांबत नाही. जम्मूमधील सांबा, अखनूर, राजौरी आणि उधमपूर येथे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. याशिवाय पाकिस्तानकडून पुन्हा एक ड्रोन पाठवण्यात आला आहेहवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचा एक ड्रोन पाडला आहे.
श्रीनगर व्यतिरिक्त, अनंतनाग आणि जम्मूच्या काही भागात पाकिस्तानी ड्रोन दिसले आहेत. सुरक्षा दलांनी श्रीनगर आणि जम्मूमध्ये ब्लॅकआउट लागू केले आहे. लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे.
 
अखनूर, राजौरी आणि आरएसपुरा आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून तोफांचा मारा करण्यात आला आहे. त्याचवेळी बारामुल्लामध्ये ड्रोन हल्ला झाला आहे.
नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू असताना, श्रीनगरमध्ये7 ते 8 स्फोटांचे आवाज ऐकू आले. दरम्यान, काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात एका संशयास्पद ड्रोनमुळे स्फोट झाला आहे.
 
पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मूच्या अनेक भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. युद्धबंदी असूनही, जम्मू-काश्मीरमधील सांबा, राजौरी, अखनूर आणि उधमपूर भागात पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्लॅक आउट किंवा युद्ध सारखी स्थिती असल्यास प्रत्येक घरात हे 6 आवश्यक गॅझेट्स असले पाहिजेत