मुंबईत झालेला 26/11 दहशतवादी हल्ला करण्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेचा हात होता अशी कबुली खुद्द पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहम्मद अली दुर्रानी यांनी दिली आहे.
'26/11 सीमापार दहशतवादाचं वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण असल्याचं', मोहम्मद अली दुर्रानी बोलले आहेत. दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी बोलताना मोहम्मद अली दुर्रानी यांनी जमात-एल-दावाचा दहशतवादी हाफिज सईदलाही चांगलंच फटकारलं आहे.
'हाफिज सईदचा काही एक उपयोग नसून त्याच्याविरोधात कारवाई करणं गरजेचं असल्याचं', दुर्रानी बोलले आहेत. मुंबई 26/11 प्रकरणी भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा तपास करत जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदवर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करायला सांगितलं आहे.
पाकिस्तानने भारताकडे 24 साक्षीदारांना जबाब नोंदवण्यासाठी पाठवण्याचा आग्रह केल्यानंतर भारताने ही नवीन मागणी केल्याचं पाकिस्तान गृहमंत्रालयाच्या अधिका-याने सांगितलं.