रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याकडून 12 हजार डॉलर्स मिळाले होते अशी माहिती बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना आपल्या लेखी जाबाबात दिली आहे.
रिपब्लिक टीव्हीच्या बाजूने टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी तीन वर्षांमध्ये पार्थो दासगुप्ता यांना एकूण 40 लाख रुपये मिळाल्याचा दावाही त्यांनी आपल्या जबाबात केला आहे.
3,600 पानांचे आरोपपत्र मुंबई पोलिसांकडून 11 जानेवारी रोजी दाखल करण्यात आले. या आरोपपत्रात बार्क फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट आणि वॉट्सअप चॅटचाही उल्लेख केलेला आहे.
आरोपपत्रात एकूण 59 जणांची विधानं आहेत. यात बार्कच्या कर्मचाऱ्यांसही काही केबल ऑपरेटर्सचाही समावेश आहे.