Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 14 April 2025
webdunia

भारतात बनला पहिला प्‍लास्‍टिकपासूनचा रस्ता

national news
पंजाबमधील गुडगावच्या सेक्‍टर ५१ मधील गेट नंबर दोनमध्‍ये प्‍लास्‍टिकपासून पहिला रस्‍ता बनविण्‍यात आला. त्‍यांच्‍याकडून दावा करण्‍यात आला आहे की, टाकाऊ प्‍लास्‍टिकच्‍या कचर्‍यापासून बनविण्‍यात आलेला हा रस्‍ता पहिल्‍या रस्‍त्‍यापेक्षा जास्‍त मजबूत असल्याचे आयुक्‍त यशपाल यादव यांच्‍या देखरेखीत या कामाची सुरुवात करण्‍यात आली होती. 
 
आयुक्‍त यशपाल यादव पुढे म्‍हणाले की, प्लास्टिक कचरा साठविण्‍यासाठी केंद्र बनविण्‍यात येतील. ज्‍यामुळे लोकांना तेथे प्‍लास्‍टिक कचरा टाकता येईल. तसेच प्लास्टिक कचर्‍यापासून अशा पद्धतीने रस्‍ता बनविण्‍याचे काम बंगळुरु येथे सुरु आहे. हा रस्‍ता जवळ-जवळ १०० मीटरचा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दूरदर्शन केंद्रात आग, एफएम रेडिओ सेवा बंद