भारतातील बँकाचे दिवाळे वाजवून परदेशात फरार असलेला उद्योगपती विजय मल्ल्याने संपूर्ण कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली आहे. लंडन हायकोर्टात कर्ज फेडण्यास आपण तयार असून भारतात न पाठवण्याची विनंती मल्ल्याने हायकोर्टाला केली आहे. मनी लाँड्रिंग, कर्ज बुडवेगिरी प्रकरणात मल्ल्यावर आरोप ठेवण्यात आले आहे. मल्ल्याने भारताला प्रतर्पण करण्याच्या आदेशाविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी दाखल याचिकेच्या सुनावणीच शेवटच्या दिवशी त्याने आपले म्हणणे मांडले. भारतातील बँकांनी संपूर्ण कर्जाची रक्कम पुन्हा घ्यावी, अशी मी बँकांना वारंवार विनंती करत आहे. मात्र, ईडीकडून त्याला नकार दिला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत हा आमचा अधिकार असल्याचे सांगत ईडी बँकांना अटकाव करत असल्याचे मल्ल्याने म्हटले.
एका बाजूला बँक आणि ईडी हे दोघेही एकाच संपत्तीबाबत संघर्ष करत असल्याचे मल्ल्याने हाकोर्टात नमूद केले. मागील चार वर्षांपासून ईडी आणि सीबीआय माझ्याबाबतीत करत असलेली कारवाई पूर्णतः चुकीची असल्याचे त्याने यावेळी न्यायालयाला सांगितले.