Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पीएम मोदी ग्रामीण भारत महोत्सवाचे उद्घाटन करीत म्हणाले 2014 पासून गावातील लोकांची सेवा करत आहे

Modi
, शनिवार, 4 जानेवारी 2025 (11:55 IST)
Prime Minister Narendra Modi News : पंतप्रधान मोदींनी ग्रामीण भारत महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी 2014 पासून गावातील लोकांची सेवा करत असल्याचे सांगितले. तसेच या महोत्सवाची थीम विकसित भारत 2047 साठी सर्वसमावेशक ग्रामीण भारत तयार करणे आहे आणि ग्रामीण भारतातील उद्योजक भावना आणि सांस्कृतिक वारशाचे कौतुक करणे हा त्याचा उद्देश आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पंतप्रधान मोदींनी महोत्सवाचे उद्घाटन केले.
 
मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींनी सर्वांना 2025 नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ते म्हणाले की 2025 च्या सुरुवातीला ग्रामीण भारत महोत्सवाचा हा भव्य कार्यक्रम भारताच्या विकासाच्या प्रवासाची ओळख करून देणारा आणि एक ओळख निर्माण करणारा आहे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी अभिनंदन करतो. लाखो खेड्यांतील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

आज लोकांना 1.5 लाखांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये आरोग्य सेवेसाठी चांगले पर्याय मिळत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही देशातील सर्वोत्तम डॉक्टर्स आणि रुग्णालये खेड्यापाड्यांशी जोडली आहे. टेलिमेडिसिनचा लाभ घेतला आहे. ग्रामीण भागातील करोडो लोकांनी ई संजीवनीच्या माध्यमातून टेलिमेडिसिनचा लाभ घेतला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: सरपंच हत्या प्रकरणातील अन्य दोन मुख्य संशयितांना अटक