Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

PM Modi Launch Rs. 75 Coin: PM मोदींनी 75 रुपयांचे नाणे जारी केले, जाणून घ्या काय आहे वैशिष्टये

PM Modi Launch Rs. 75 Coin:  PM मोदींनी 75 रुपयांचे नाणे जारी केले, जाणून घ्या काय आहे वैशिष्टये
, रविवार, 28 मे 2023 (17:19 IST)
पंतप्रधान मोदींनी रविवारी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त 75 रुपयांचे विशेष नाणे जारी केले. आज तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवन देशाला समर्पित केले. यासह त्यांनी लोकसभेच्या सभागृहात ऐतिहासिक सेंगोलची स्थापना केली. 
 
उलट बाजूस संसद संकुलाची प्रतिमा आहे. समोरच्या बाजूला अशोक स्तंभ, ज्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेले आहे. अशोक स्तंभाच्या डाव्या बाजूला देवनागिरी लिपीत भारत तर उजव्या बाजूला इंग्लिशमध्ये भारत लिहिलेला आहे. 
त्याच्या वरच्या भागात संसदेचे संकुल हिंदीत आणि तळाशी इंग्रजीत लिहिलेले आहे. संसदेच्या चित्राच्या खाली 2023 हे वर्ष लिहिले आहे.
 
या नाण्याचं वजन 33 ग्रॅम असल्याचं सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील टांकसाळीत तयार करण्यात आलेले हे नाणे 50 टक्के चांदी,40 टक्के तांबे आणि 5-5 टक्के निकेल-जस्त यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आले आहे. या नाण्याचा व्यास 44 मिमी आहे
 
काठावर असलेल्या 200 सेरेशन आकाराच्या गोलाकार नाण्यांबाबत, वित्त मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले की ते दुसऱ्या शेड्यूलमध्ये दिलेल्या निर्देशांनुसार तयार केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात75 रुपयांची नाणी जारी केली, त्यावर नवीन संसद भवनाचे चित्रही कोरले आहे. 
 



Edited by - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Earthquake Today: काश्मीर ते दिल्लीपर्यंत भूकंपाचे धक्के, तीव्रता 5.2 होती