पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोशल डिस्टंसिंगचे केले आवाहन

सोमवार, 23 मार्च 2020 (09:40 IST)
जनता कर्फ्यूला उदंड प्रतिसाद दिल्यानंतर जनतेने टाळ्या वाजवून आणि घंटा नाद करुन करोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या योद्ध्यांनाही सलाम केला. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोशल डिस्टंसिंगचे आवाहन केले आहे.  
 
मोदींनी ट्विटद्वारे म्हटलं, “हा धन्यवादचा नाद आहे. त्याचबरोबर एका मोठ्या लढाईला सुरुवात करण्याचा हा शंखनादही आहे. याच संकल्पासोबत याच वेळेपासून एका मोठ्या लढाईसाठी आपण स्वतःला बंधनात बांधून घेऊयात”
 
करोना विषाणूच्या लढाईचे नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देशाने एका मनाने धन्यवाद दिलेत. यासाठी देशवासियांचे खूप खूप आभार, अशा शब्दांत मोदींनी जनतेचे आभारही मानले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली