Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

terrorist
मुंबई , गुरूवार, 27 एप्रिल 2023 (10:07 IST)
मुंबईत पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा कट रचला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र दिनानिमित्त म्हणजेच 1 मे रोजी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परेड दरम्यान दहशतवादी आणि समाजकंटक हल्ला करू शकतात, अशी माहिती मिळाली आहे. शिवाजी पार्कची हवाई जागा दहशतवादी हल्ल्यासाठी वापरली जाऊ शकते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची जीवित आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे.
 
या इनपुटनंतर मुंबई पोलीस आता अलर्ट मोडवर आले आहेत. दहशतवादी हल्ल्याची शक्यता पाहता सध्या कलम 144 लागू करण्यात आले आहे. यासोबतच दादर, शिवाजी पार्क माहीम आणि वरळी हे भाग नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. याशिवाय पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त वाढवला आहे. संशयितांची चौकशी सुरू आहे.
 
मुंबई पोलिस अलर्ट
दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेनंतर आता मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इंटेलिजन्स इनपुटनंतर आता पोलिस पूर्वीपेक्षा अधिक सतर्क झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा पुरेपूर काळजी घेत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Badrinath Dham बद्रीनाथ यात्रेला सुरुवात