राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या तसेच लोककल्याण आणि देशाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला आपल्या शुभेच्छा संदेशात मुर्मू म्हणाल्या की, “यानिमित्ताने आपण भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणी आत्मसात करूया आणि देशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा करूया. तसेच जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर, मी सर्व देशवासियांना आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना माझे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देते. जन्माष्टमीच्या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो. तसेच आनंदाचा हा सण आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या आदर्शांना आत्मसात करण्यासाठी प्रेरणा देतो.
जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला आपल्या संदेशात जगदीश धनखर यांनी लोकांना नैतिकतेचा मार्ग स्वीकारून सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच उपराष्ट्रपती म्हणाले की, “सर्व देशवासियांना जन्माष्टमीच्या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
तसेच पंतप्रधान मोदींनी जय श्री कृष्णाचा जयघोष करून महाराष्ट्रातील जळगाव येथे 'लखपती दीदी' मेगा परिषदेची सुरुवात केली आणि लोकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.
Edited By- Dhanashri Naik