Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रामनाथ कोविंद 65.65 टक्के मतांसह भारताचे नवे राष्ट्रपती

रामनाथ कोविंद 65.65 टक्के मतांसह भारताचे नवे राष्ट्रपती
भारताचे 15 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड झाली आहे. राष्ट्रपती निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असलेले कोविंद राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आले. आज झालेल्या मतमोजणीत रामनाथ कोविंद यांना सात लाख, दोन हजार, 644  म्हणजेच एकूण मतदानापैकी 65.65 टक्के मते, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांना तीन लाख,  67 हजार 314 म्हणजेच एकूण मतदानापैकी 34.35 टक्के एवढी मते मिळाली आहेत. संसदेच्या महासचिवांनी कोविंद यांना फोन करून राष्ट्रपतीपदी त्यांच्या विजयाची औपचारिक माहिती दिली आहे.  
 
रामनाथ कोविंद यांनी मानले मतदान करणाऱ्या सर्वांचे आभार, राजेंद्र प्रसाद, डॉ. राधाकृष्ण यांनी भूषवलेल्या पदावर काम करणे जबाबदारीची जाणीव करून देणारे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कोविंद यांचे अभिनंदन
रामनाथ कोविंद भारताचे नवे राष्ट्रपती. रामनाथ कोविंद यांना 66 % म्हणजेच 7 लाख 2 हजार 44 मतं, तर मीरा कुमार यांना 34 %- 3 लाख 67 हजार 314 मतं.
राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी संपली, कोविंद यांना 65.65 टक्के मते, मीरा कुमार यांना 34.35 टक्के मते

राष्ट्रपती निवडणुकीची पहिली फेरी पूर्ण : पहिल्या फेरीत रामनाथ कोविंद यांना 60 हजार 683 मते, तर मीरा कुमार यांना 22 हजार 941 मते

समाचार एजेंसी एएनआयनुसार राष्ट्रपती निवडणूकीत आतापर्यंत एनडीएचे रामनाथ कोविंद यांना एकूण 522 मत मिळाले आहे ज्याचे कूल प्रातिनिधिक मूल्य तीन लाख 69 हजार 576 वोट झाले. तसेच मीरा कुमार यांना आतापर्यंत 225 मत मिळाले आहे. ज्याचे कूल प्रातिनिधिक मूल्य एक लाख 59 हजार 300 वोट झाले.  21 वोट अवैध आढळले. राष्ट्रपती निवडणुकीत ऐकून 776 संसद आणि 4120 विधायक वोट देण्याचे पात्र होते. निवडणुकीत 99.41 टक्के मतदान झाले होते.  

संसदेमध्ये राष्ट्रपती पदासाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या मतमोजणीच्या सुरुवातीलाच रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी मोठी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीतील मतमोजणीत कोविंद यांना 60 हजार 683 मते मिळाली आहेत. तर काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांना 22 हजार 941 मते मिळाली आहे.  संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होणार आहेत. एकूण आठ टप्प्यात मतमोजणी होईल. यानंतर निवडणूक आयोगाचे रिटर्निंग ऑफिसर निकालाची अधिकृत घोषणा करतील.  
 
राष्ट्रपतीपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीची आज सकाळी 11 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. रामनाथ कोविंद हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे NDA आणि मीरा कुमार या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या UPA उमेदवार आहेत. राष्ट्रपतिपदासाठी 17 जुलैला मतदान झाले होते. राज्यांमधील मतदान पेट्या दोन दिवसांपूर्वीच संसद भवनात पोहोचलेल्या आहेत.
 
मतमोजणीची व्यवस्था संसद भवनातील 62 क्रमांकाच्या सभागृहात करण्यात आली आहे. सर्वात आधी संसद भवनातील मतपेट्या उघडण्यात येतील. त्यानंतर राज्यांमधून आलेल्या मतपेट्या अल्फाबेटनुसार उघडण्यात येतील. मतमोजणी चार वेगवेगळ्या टेबलांवर होईल. आठ टप्प्यांत ही मतमोजणी होईल.

सर्वप्रथम संसद भवनातील मतपत्रिकांची मोजणी होईल. त्यानंतर राज्यांच्या इंग्रजी आद्याक्षरांनुसार त्या त्या ठिकाणच्या मतपत्रिकांची मोजणी केली जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पकडली गेली 4 कोटी रुपयांची पाल