भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्को येथे झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली अर्पण केली.मोदींनी ट्वीट करत म्हटलंय की, “मॉस्कोमधील दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. आमच्या प्रार्थना पीडितांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. या दु:खाच्या वेळी भारत रशियन सरकार तेथील लोकांसोबत उभे आहोत.
रशियाची राजधानी मॉस्कोमधील क्रोकस सिटी हॉल या कॉन्सर्ट हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबारात 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले असल्यची माहिती रशियन सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्याची जबाबदारी कथित इस्लामिक स्टेट या कट्टरतावादी संघटनेच्या ISKP या गटानं घेतल्याचं म्हटलं जातंय.
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्याकडून मॉस्को हल्लाचा निषेध करण्यात आला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे. "मास्को मधील झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमचे विचार आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहे. या दुःखाचा क्षणात आम्ही रशियन सरकारच्या पाठीशी उभे आहोत.
मॉस्कोच्या वायव्येकडील क्रास्नोगोर्स्क या उपनगरात क्रोकस सिटी रिटेल आणि कॉन्सर्ट कॉम्प्लेक्समध्ये हा हल्ला झाला. इथे 'पिकनिक' नावाच्या रशियन रॉक बँडची मैफल आयोजित केली होती. पण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी बंदूकधाऱ्यांनी उपस्थितांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली.हल्ल्यावेळी सभागृहात सहा हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. घटनाास्थळी उपस्थित एकानं सांगितले आहे की, रॉक ग्रुप स्टेजवर येण्यापूर्वीच हा हल्ला झाला. 'पिकनिक'चे सर्व कलाकार सुरक्षित वाचले आहेत.
हल्लेखोरांनी कुठल्यातरी ज्वलनशील पदार्थ किंवा बाँबसदृष्य उपकरणाचा वापर केल्याची शक्यता वर्तवली जाते आहे, कारण हल्ला सुरू झाल्यावर इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांच्या काचा फुटल्या. या भागात आग लागली आणि छताचा काही भागही कोसळला.