आज संत रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील करोलबाग येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात पूजा केली. यानंतर पीएम मोदींनी मंदिर परिसरात उपस्थित महिलांसोबत भजन कीर्तन केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी पीएम मोदी तेथे उपस्थित लोकांना भेटले आणि त्यांच्याशी संवाद साधतानाही दिसले.
संत रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोलबाग येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात भाविकांसह भजनात भाग घेतला. यावेळी पीएम मोदी भक्तांसोबत बसून मंजिरा वाजवताना दिसले.