Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुलवामाः स्फोटाच्या सामानाची झाली ऑनलाइन खरेदी

पुलवामाः स्फोटाच्या सामानाची झाली ऑनलाइन खरेदी
नवी दिल्ली , सोमवार, 9 मार्च 2020 (12:56 IST)
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोराने स्फोटासाठी आयईडी बनवण्यासाठी लागणार्‍या रसायनांची ऑनलाइन खरेदी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पुलमावा दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) तपास सुरू असून तपासादरम्यान ही माहिती उघड झाली आहे. गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी या दिली जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला होता.

यात 40 जवान शहीद झाले होते. तपासादरम्यान एनआयएच्या आग्रहावरून अ‍ॅमेझॉनच्या भारतातील कार्यालयाने खरेदीदाराच्या ऑनलाइन शॉपिंग अकाउंटचा तपशील एनआयएला दिला. या माहितीच्या आधारे श्रीनगरमध्ये राहणार्‍या वेझ-उल-इस्लाम या 19 वर्षीय युवकाला शुक्रवारी अटक करण्यात आली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नक्षलवाद्यांशी लढा देतेय 'ही' आठमहिन्यांची गर्भवती