Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

२६ जानेवारी साजरा करण्यासाठी सरकारकडून खास स्पर्धां

२६ जानेवारी साजरा करण्यासाठी सरकारकडून खास स्पर्धां
, शनिवार, 6 जानेवारी 2018 (16:16 IST)
२६ जानेवारी साजरा करण्यासाठी मोदी सरकारने खास स्पर्धांचे आयोजन केले आहे.या स्पर्धेतील विजेत्याला लाख रूपये बक्षीस मिळणार आहे. हे बक्षीस मिळवण्यासाठी तुम्हाला घरबसल्या फक्त ५ मिनीटं खर्च करायचे आहेत. या स्पर्धेत तुम्ही देखील भाग घेऊ शकता. या स्पर्धेतील विजेत्याला १ लाख तर दूसऱ्या विजेत्याला ७५ हजार आणि तिसऱ्या विजेत्याला ५० हजार रूपयांचे बक्षीस मिळणार आहे.
 
याशिवाय सरकारकडून दोघांना सांत्वना पुरस्कार देण्यात येईल. त्यात प्रत्येक स्पर्धकाला १५-१५ हजार रूपयांचे बक्षीस मिळेल. यात वयाची कोणतीही अट नसली तरी या स्पर्धेचे आयोजन दोन विभागात करण्यात आले आहे. १८ आणि पुढील वयोगटाचा पहिला गट आणि दुसऱ्या गटात १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुले सहभागी होऊ शकतात. दोन्ही विभागात वेगवेगळी बक्षीसे दिली जातील. या स्पर्धेत तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील ते सोडवण्यासाठी तुम्हाला ५ मिनिटांचा कालावधी देण्यात येईल.
 
मोदी सरकारने देशातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी मायगोव डॉट इन (http://mygov.in)आणि मायगोव मोबाईल अॅप सुरू केले आहे. या पोर्टलवर किंवा अॅपवर अशाप्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. 
 
आता या बेवसाईटवर नवीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सरकारने सांगितले की, राष्ट्राची सेवा आणि सुरक्षिततेसाठी वीरता पुरस्कार म्हणजेच परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ति चक्र आणि शौर्य चक्र दिले जाते. या पुरस्कारांबद्दल आणि हे पुरस्कार मिळालेल्या सैनिकांबद्दल प्रश्न विचारण्यात येतील. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ५ मिनीटाच्या आत द्यायची आहेत.
 
या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास quiz.mygov.in वर लॉगइन करा. त्यानंतर समोर  क्विज सुरू होईल. यात तुम्हाला १५ प्रश्न विचारण्यात येतील. यांची उत्तरे ५ मिनिटात तुम्हाला द्यायची आहेत.
 
पहिला पुरस्कार : १ लाख रुपये
दूसरा पुरस्‍कार : ७५ हजार रुपये
तीसरा पुरस्‍कार : ५० हजार रुपये
सांत्‍वना पुरस्‍कार (दो) : १५ हजार रुपये
 
ही स्पर्धा १ जानेवारी संध्याकाळी ४ वाजल्यापासून सुरू झाली आहे. यात भाग घेण्यासाठी १० जानेवारी रात्री ११-५९ मिनिटापर्यंतचा वेळ तुमच्याकडे आहे.या स्पर्धेतील विजेत्याला २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात आणि २८ जानेवारीला बिटिंग रिट्रीटमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. जर तुम्ही दिल्लीच्या बाहेर राहत असाल तर दिल्लीत पाच दिवस राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय मिनिस्‍ट्री ऑफ डिफेंसतर्फे करण्यात येईल. प्रवासासाठी तुम्हाला थर्ड एसीचे रेल्वे तिकीट देण्यात येईल. १८ वर्षाखालील मुलासोबत येणाऱ्या एकाची सोय करण्यात येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घर खरेदीवर ३ ते ४ लाखापर्यंत सबसिडी