Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पेशेवर कार रेसर आणि त्याच्या बायकोचे कार अपघातात जळून मृत्यू

पेशेवर कार रेसर आणि त्याच्या बायकोचे कार अपघातात जळून मृत्यू
चेन्नई , शनिवार, 18 मार्च 2017 (10:56 IST)
प्रफेशनल कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची बायको निवेदताची एका कार अपघातात मृत्यू झाला आहे. त्याची बीएमडब्ल्यू कार चेन्नईच्या सँथम रोडवर कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. चेन्नईच्या संतहोम हाय रोडवर हा भीषण अपघात घडला. अश्विनच्या बीएमडब्ल्यू कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका गाडीला धडक दिली आणि लगेच पेट घेतला. 
 
अश्विन आणि निवेदीता दोघांना कारचे दरवाजे उघडता न आल्याने आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. अपघाताच्यावेळी अश्विन गाडी चालवत होता. निवेदीता डॉक्टर होती ती एका खासगी रुग्णालयात नोकरीला होती. आगीच्या ज्वाळांनी वेढलेली गाडी पाहिल्यानंतर रस्त्यावरुन जाणा-या वाटसरुंनी लगेच चेन्नई पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अग्निशमन अधिका-यांनाच आगीवर नियंत्रण मिळवायला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला.
 
शव पूर्णपणे जळाल्यामुळे सुरुवातीत त्यांना ओळखणे फारच अवघड झाले होते. नंतर कारच्या रजिस्ट्रेशन नंबरमुळे पोलिसांना त्यांची ओळख पटली. अश्विन आणि त्याची बायको अलकापक्कम भागात राहत होते. ते एमआरसी नगरमध्ये आपल्या मित्राला भेटायला आले होते. येथुन घरी जाताना हा अपघात झाला.  
 
पोलिसांनी कारचा दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी हे मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भिवंडीत टायराच्या गोदामात आग