rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदीना दिला कोट्यावधी रुपयांचा सहाराने सहारा - गांधी

rahul gandhi
, गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (09:39 IST)
गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांना सहारा कंपनीने त्यांना सहा महिन्यात 9 वेळा  कोट्यवधी रुपये दिले असल्याला गंभीर आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.तर दुसरीकडे  त्यांनी याचा पुरावा सुद्धा भरसभेत जाहीर केला आहे..
 
राहुल गांधी यांनी आपण काही बोललं तर भूकंप होईल असा इशारा दिला होता. अखेर आज राहुल गांधी यांनी ‘तो’ आरोप जाहीर केला आहे. राहुल यांनी  गुजरातमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.  नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा सहारा कंपनीने 6 महिन्यात 9 वेळा पैसे दिले होते. 2013 मध्ये आयटीच्या छाप्यात ही बाब उजेडात आली. सहाराच्या अधिकाऱ्यांनीही आपल्या डायरीत याची नोंद लिहिलेली आहे असं राहुल यांनी सांगितलं आहे.त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा तर राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी हा मोठा वाद निर्माण झाला असून,भाजपा लवकर यावर उत्तर देईल असे चिन्हे आहत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तहानलेल्या लातूरला आठवड्यात दोनदा पाणी