Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राहुल गांधींचा आरएसएस आणि पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल

राहुल गांधींचा आरएसएस आणि पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल
, सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (12:00 IST)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी रविवारी टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. 

ते म्हणाले, आरएसएसला वाटते की भारत एक कल्पना आहे. भारत हा विचारांचा बहुसंख्यक देश आहे. त्यात सर्वांना भाग घेण्याची संधी दिली पाहिजे. स्वप्न बघू देण्याची संधी द्यावी. त्यांना जाती धर्म न विचारता स्थान द्यावे. हा लढा आहे. भारताच्या कोटयावधी जनतेला स्पष्टपणे समजले की भारताचे पाणीप्रधान भारतीय संविधानावर हल्ला करत आहे. मी जे काही सांगितले ते संविधानात आहे. भाजप इतिहासावर हल्ला करत आहे. परंपरेवर हल्ला करत आहे. राज्यांवर हल्ला करत आहे. असे ते म्हणाले. 

सध्या देशात बेरोजगारी वाढली आहे. भारत अमेरिका आणि पश्चिमच्या इतर देशांमध्ये बेरोजगारी वाढली आहे. पण चीन मध्ये नाही. कारण चीन जागतिक उत्पादनावर वर्चस्व गाजवत आहे.भारत देशाने स्वयंचे उत्पादन केले तर तो चीनला स्पर्धा देऊ शकतो. भारतात कौशल्यांची कमतरता नाही.

40, 50 आणि 60 च्या दशकात अमेरिका हे जागतिक उत्पादनाचे केंद्र होते. जे काही बनले ते इथे बनवले. कार असो, वॉशिंग मशिन असो की टीव्ही, सर्व वस्तू अमेरिकेत बनत असत, पण आता उत्पादन अमेरिकेतून हलवले आहे. ज्या वस्तू अमेरिकेत तयार होत होत्या त्या आता कोरिया, जपान आणि चीनमध्ये स्थलांतरित झाल्या आहेत. ते म्हणाले की चीनने जागतिक उत्पादनात सर्वांना मागे टाकले आहे.

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय स्थलांतरितांबाबत ते म्हणाले की, ते जेव्हा भारतातून या देशात आले तेव्हा ते संविधान, आदर आणि नम्रता या मूल्यांसह आले होते. भारतातून आलेल्या नागरिकांच्या हृदयात संविधानाचे मूल्य, सन्मानाचे मूल्य ठेवतात. अमेरिकेत आल्यावर तुम्ही अहंकार घेऊन आलेला नाही. तुम्ही सन्मानाने आला आहात असे ते म्हणाले. 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

DPL 2024 : ईस्ट दिल्ली रायडर्सने रोमांचक सामन्यात दिल्ली प्रीमियर लीग जिंकली