काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अध्यक्षपदासाठी आतापर्यंत कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता आहे.
सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरताना पक्षाचे देशभरातील 900 नेते काँग्रेस मुख्यालयात उपस्थित राहतील. राहुल गांधींच्या उमेदवारीचा कार्यक्रम भव्य बनवण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने नेते दिल्लीतील अकबर रोड इथल्या मुख्यालयात दाखल होणार आहेत.