सध्याचे केंद्र आणि मध्य प्रदेश मधील भाजप सरकार हे सर्वच बाबतीत अत्यंत असंवेदनशील आहे. मात्र सरकारला शेतकऱ्यांची कोणतीही काडीचीही चिंता नाही, अशी जोरदार टीका राहुल गांधीं यांनी केली आहे.
काँग्रेस सरकार सत्तेत येताच लगेच १० दिवसांत शेतकऱ्याचे कर्ज माफ केले जाईल यासाठी ११ दिवस लागणार नाही अशी मी खात्री देतो असे सांगत , काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला आहे. राहुल गांधी यांच्या सभेला जोरदार गर्दी झाली होती. मध्यप्रदेश मध्ये शेतकरी वर्गावर जो गोळीबार झाला त्यांच्यावर सत्तेत येताच कारवाई सुरु केली जाणार असे ठामपणे गांधी यांनी सागितले आहे.
मध्य प्रदेशातील मंदसौर येथून काँग्रेसने विधानसभा निवडणूक प्रचाराचा सुरु झाला आहे . या वेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि मध्य प्रदेशची जनता बहूसंख्येने उपस्थित होती. या वेळी उपस्थितांना संभोधीत करताना राहुल गांधी काहीसे आक्रमक झालेले होते. राहुल हे नेहमीच्या तुलनेत अधिक आत्मविश्वासून जाणवत होते.