राहुल गांधी यांची खासदारकी रद्द. सुरत न्यायालयाने कालच त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यासंदर्भातील अधिसूचना लोकसभा सचिवालयाने जारी केली आहे. मानहानीच्या प्रकरणात सुरतच्या कोर्टाने गुरुवारीच राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी आडनावाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप राहुल गांधींवर झाला होता. ज्यांच्या विरोधात गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता.राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे.
केरळमधील वायनाड येथील लोकसभा सदस्य राहुल गांधी यांना मुख्य न्यायदंडाधिकारी, सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर ते लोकसभेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरले आहेत. ही अपात्रता त्याच्या दोषी ठरल्याच्या दिवसापासून म्हणजेच 23 मार्च 2023 पासून लागू होईल.