नवी दिल्ली- नववर्षनिमित्त सुटी घालविण्यासाठी लंडनला गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी भारतात परतले असून निवडणुकीच्या कामालाही लागले आहेत. भारतात आल्या- आल्या राहुल यांनी उत्तर प्रदेशातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
काँग्रेसला उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत घरोबा करायचा असल्याने राहुल यांची मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी भेट होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी 31 डिसेंबर रोजी ट्विट करून सुटी घालविण्यासाठी परदेशात जात असल्याचे स्पष्ट केले होते. राहुल लंडनला असतानाच निवडणूक आयोगाने 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणाही केली होती.