हैदराबादमधील एका व्यावसायिकाच्या घरातून चोरी करून ट्रेनने पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरांना रेल्वे सुरक्षा पथकाने अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून १ कोटी ३५ लाख ५५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादमधील एका व्यावसायिकाच्या घरातून चोरी करून ट्रेनने पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरांना रेल्वे सुरक्षा पथकाने अटक केली. अटक केलेल्या चोरट्यांकडे १ कोटी ३५ लाख ५५ हजार रुपयांचे सोने, हिरे आणि चांदीचे दागिने आणि १९ लाख ६३ हजार ७३० रुपयांची रोख रक्कम होती. या तिघांकडून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, चीन, सिंगापूर, सौदी अरेबिया अशा २४ देशांच्या रोख आणि चलनासह कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या. साहित्यासह आरोपींना हैदराबादमधील करैनागुढा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बुधवारी पहाटे तेलंगणा एक्सप्रेसमध्ये आरपीएफ आणि सीबीआय पथकाने ही कारवाई केली.
Edited By- Dhanashri Naik