Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 14 April 2025
webdunia

रेल्वेसाठी आणणार सरकार नवी योजना…भाडे वाढण्याची शक्यता…

railway ticket increase
रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांकडून जास्त भाडे वसूल करण्यासाठी नवीन प्रस्ताव सादर केला आहे.
 
रेल्वे प्रवाशांना खालची सीट (लोअर बर्थ) हवी असेल तसेच उत्सवांच्या सीझनमध्ये प्रवास करायचा असेल तर जास्त पैसे मोजावे लागू शकतात. रेल्वेच्या यासंबंधी एका समिती या सिफारशी सादर केल्या आहेत. जर रेल्वे बोर्डाने या सिफारशीवर शिक्कामोर्तब केले तर प्रवाशांना खालची सीट तसेच उत्सवांच्या सीझनमध्ये प्रवास करताना अधिक पैसे द्यावे लागतील.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात प्रवाशांना पुढील सीटसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवाशांनाही पसंतीची सीट मिळवण्यासाठी जास्त शुल्क द्यावे लागतील. तसेच काही विशेष मार्गावरील लोकप्रिय रेल्वेंचे भाडेही वाढवले जाऊ शकते. समितीने आपला अहवाल रेल्वे बोर्डाला १५ जानेवारीला सादर केला. समितीने फ्लेक्सी पे प्रणालीत या बदलांच्या सूचना दिल्या आहेत. या प्रणालीत प्रिमियम रेल्वेचे भाडे ५० टक्के वाढवले जाऊ शकते. याला वेगवेगळ्या स्तरातून विरोध होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा