Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेल्वे आता स्थानिक खानावळी जेवण बनणार

रेल्वे आता स्थानिक खानावळी जेवण बनणार
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कॅटरिंग धोरणाची घोषणा रेल्वे मंत्रालयानं केली आहे. या नव्या धोरणांनुसार, रेल्वे विभागाच्या स्थानिक खानावळी (बेस किचन) मध्ये जेवण तयार केलं जाईल. तसेच आयआरसीटीसीच्या माध्यमातूनच रेल्वे प्रवाशांपर्यंत ते पोहोचवलं जाईल.


रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबतची माहिती देताना सांगितलं की, या नव्या धोरणानुसार, आयआरसीटीसीकडे कॅटरिंग व्यवस्था सांभाळण्याची जाबाबदारी दिली आहे. तर रेल्वेमध्ये खराब जेवण मिळण्याच्या प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन, रेल्वे प्रवांशांना जेवण पोहोचवण्याची जबाबदारी देखील आयआरसीटीसीचीच असेल. तेव्हा रेल्वेमध्ये आता चविष्ठ जेवण उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी रेल्वेकडे असणार, असं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं आहे.

विशेष म्हणजे, या नव्या धोरणात रेल्वेमध्ये जेवण पोहोचवण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्याचं बंद करण्यात आलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नोकरीचा विषय मुख्यमंत्री तडीस नेणार का? - विजय चौधरी