अरबी समुद्र आणि तामिळनाडू किनारपट्टी परिसरात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी हवामान तयार झालं असून विकेंडनंतर राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारपासून पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान खात्याने सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, उत्तर महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाडा परिसरात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सध्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील बहुतांशी जिल्यह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.