सलग पाचव्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे तामिळनाडूत चेन्नईसह किनारपट्टीवरील जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले. चेन्नईत चोवीस तासांत २०२ मिमी पावसाची नोंद झाली. १ डिसेंबर २०१५ नंतरच्या पुरानंतरचा हा एका दिवसातील पावसाचा नवा विक्रम आहे. कांचीपुरममध्ये सर्वाधिक ६२७ मिमी पाऊस झाला. राज्यात शुक्रवारी १९३ मिमी पाऊस झाला. किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.