Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुराची भीती : लपविले पिशवीत;मुलाचा मृत्यू

पुराची भीती : लपविले पिशवीत;मुलाचा  मृत्यू
, शुक्रवार, 28 जुलै 2017 (11:09 IST)
गुजरात मध्ये पुराने थैमान घातले आहे. नागरिक जीव वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहेत. असाच प्रकार करत असतानान मात्र एका बालकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
 
गुजरातमधील ततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.याच  पुराच्या पाण्यापासून बचाव करताना एका चिमुरड्यचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.  गुजरात येथील  असलाली या गावापासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गाम्दी गावात हा प्रकार घडला आहे.  अनु कटारिया  40 वर्षीय यांनी त्यांच्या 25 दिवसाच्या मुलाला बाहेरील पुरस्थितीपासून तसंच किटाणुंपासून वाचविण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले होते. मात्र हे बालक जवळपास  8 तास त्या प्लास्टिकच्या पिशवीत होते. त्यामुळे त्या बंद प्लास्टिकच्या पिशवीत गुदमरून त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मृत पावलेल्या बाळाचे नवा हिमांशू असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनु कटारिया यांना ताब्यात घेतलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई: महाविद्यालयांना 31 जुलैपर्यंत सुट्टी