कोकणात मान्सून आल्या नंतर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं दमदार सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. यामध्ये मुंबई मधील असलेल्या कांदिवली, मालाड, दहिसर, मिरारोड या भागात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकर सुखावले आहे.दक्षिण व मध्य मुंबईमध्ये रिमझिम पावसामुळे वातावरणात सुखद गारवा अनुभवायला मिळाला. पुढच्या काही तासात मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.मान्सूनचा पाऊस दाखल होण्याबद्दल हवामान खात्यानं अधिकृत घोषणा केलेली नाही.त्यामुळे पाउस जरी होत असला तर जून १४ नंतरच मान्सून सक्रीय दिसणार आहे.