Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशाच्या राजकारणात मोठी घडामोड राज ठाकरे सोनिया गांधी यांची भेट

देशाच्या राजकारणात मोठी घडामोड राज ठाकरे सोनिया गांधी यांची भेट
, मंगळवार, 9 जुलै 2019 (09:45 IST)
राजधानी दिल्ली येथे दौऱ्यावर असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज काँग्रेसच्या सर्वेसर्वा व माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. तर येत्या  काही महिन्यांत आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे नव्या समीकरणांच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या भेटीमुळे राज्यातील आणि देशातील राजकारण तापले आहे. राज यांची भेट ही विधानसभा निवडणुकीच्या काळातील महत्वाची घडामोड मानली जात आहे.  
 
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत व त्या आगोदरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात जोरदार आघाडी  उभी केली आहे. देशातील झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाचे उमेदवार न देता भाजपाविरोधात जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे राज्यात मोदींविरोधात वातावरण निर्मिती झाली होती. पण प्रत्यक्ष निकालांमध्ये त्याचा फारसा परिणाम दिसून आला नव्हता. मात्र दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या राज ठाकरे यांनी अचानक  सोनिया गांधींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.यामुळे विधानसभा निवडणुकीत नव्या समीकरणे उदयास येत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांना काँग्रेसने जोरदार विरोध दर्शवला होता. आता मात्र  राज ठाकरे हे थेट सोनिया गांधींच्याच भेटीला गेल्याने मनसेला महाराष्ट्रातील महाआघाडीत सामावून घेण्याची प्रक्रिया नव्याने सुरू होण्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आर्थिक राजधानीत अजूनही जोरदार पाऊस, राज्यातील सर्व महत्वाचे अपडेट