मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हाफकिन्स व हिंदुस्तान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.या मागणीचा केंद्र सरकाने ४८ तासांतच परवानगी दिली त्याबद्दल राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे.
महाराष्ट्राला १००% लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून, राज्यातल्या सर्व वयोगटातील १००% लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवंय. या राज ठाकरेंच्या मागणीचा युध्दपातळीवर प्रयत्न सुरु, ३० वयोगटा पुढील नागरीकांना लवकरच कोव्हीडची लस मिळण्यास सुरवात होणार का ? या कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.