Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Rajasthan: नवऱ्यामुलाचे लग्नासाठी आंदोलन, नवरी गेली पळून,पोलिसांत तक्रार दाखल

Rajasthan:  नवऱ्यामुलाचे लग्नासाठी आंदोलन, नवरी गेली पळून,पोलिसांत तक्रार दाखल
, बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (18:35 IST)
Rajasthan: असं म्हणतात लग्नाच्या गाठी देवाकडे बांधल्या जातात. कधी कधी तर लग्नासाठी आलेली वरात देखील परतते.राजस्थान मध्ये एका नवऱ्यामुलाने ज्या मुलीशी लग्न करण्यासाठी घरात 13 दिवस आंदोलन केलं होते. ती मुलगी लग्न झाल्यावर चक्क आपल्या प्रियकरासोबाबत पळून गेली आहे. 
 
या मुळे मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. तिचा सगळीकडे शोध घेऊन देखील ती सापडली नाही. या प्रकरणी तिची बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आहे.  

ही घटना राजस्थानच्या पाली येथील सेणा गावातील आहे. या गावातील एक तरुणीचं लग्न ठरलं होत. मात्र ती लग्नापूर्वी पळून गेली होती. तिच्यासाठी नवऱ्याने थेट उपोषणाला बसला आणि त्याने 13 दिवस पर्यंत मुलीच्या घरासमोर बसले. तिने लग्नासाठी होकार दिला आणि त्यांचं लग्न झालं. आनंदात गाजत वाजत त्याने तिला घरात आणल.मात्र  मधेच काय झालं आणि ती विवाहित तरुणी माहेरी आली आणि आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. 
 
या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.त्यांची मुलगी 4 ऑक्टोबर रोजी सासरहून माहेरला आली. तिने 6 ऑक्टोबर रोजी घरी परत जाण्यासाठी सासू- सासऱ्यांना फोन केला. पण अचानक काय झालं. रात्री सर्व जण झोपलेले असता ती काळोख्यात एका तरुणासोबत पळून गेली. तिचा सर्वत्र शोध घेत आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 
 



Edited by - Priya Dixit   
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Nagpur : नागपुरात खोदकाम करताना आई जगदंबेचा मुखवटा सापडला