राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात राहणाऱ्या पूरीलाल याच्या काकांनी अनोखी लग्नपत्रिका छापली आ हे. लग्नपत्रिकेच्या दोन्ही बाजूला संदेश लिहिले आहेत. ‘मेरा सपना, घर परिवार का सपना, शौचालय उपयोग ही, सम्मान है अपना’, ‘घर महकेगा, परिवार महकेगा, बेटी पढ़ाओ, जग महकेगा’ ,’जन-जन का है, बस एक ही सपना, खुले में शौच मुक्त हो भारत अपना’, ‘जन-जन की है जिम्मेदारी, घर-घर शौचालय ही समझदारी’ असे अनेक संदेश या पत्रिकेद्वारे देण्यात आले आहेत.
पूरीलाल याचे काका रामविलास हे स्वच्छ भारत अभियानात सहभागी असून आजूबाजूच्या गावात स्वच्छतेविषयी आणि शौचालय बांधणीसाठी जनजागृती करण्याचे काम करतात. म्हणूनच आपल्या पुतण्याच्या लग्नपत्रिकेवर असे विविध संदेश छापून त्यांनी स्वच्छेतेविषयी जनजागृती केली आहे.