Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 27 March 2025
webdunia

इंजिन तपासणीसाठी उतरला अन राजधानीखाली गेला

इंजिन तपासणीसाठी उतरला अन राजधानीखाली गेला
, सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (16:27 IST)
राजधानी एक्स्प्रेसखाली आल्यामुळे सौराष्ट्र जनता एक्स्प्रेसच्या लोको पायलटचा जागीच मृत्यू झाला. लोको पायलट इंजिन तपासणीसाठी उतरला असताना हा दुर्दैवी अपघात घडला.रविवारी संध्याकाळी बोईसरजवळ सौराष्ट्र एक्स्प्रेस साईडिंगला लावण्यात आली होती. ट्रेनच्या इंजिनच्या तपासणीसाठी लोको पायलट उमेश चंद्र आर (४५) हे उतरुन इंजिनखाली गेले. त्याचवेळी समोरुन राजधानी एक्स्प्रेस येत होती. समोरुन येणारी राजधानी एक्स्प्रेस पाहून उमेश गडबडले आणि स्लीपरवर घसरुन राजधानी एक्स्प्रेसखाली आले. 

वलसाडहून नवीन चालक आल्यानंतर रात्री 8.15 वाजताच्या सुमारास ट्रेन गुजरातकडे रवाना झाली.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता फोटोकॉपी नको, ओळखपत्राची मूळ प्रत लागणार