मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात रविवारी सायंकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान झालेल्या एका रस्ते अपघातात दहा हून अधिक जणांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजस्थानमधील मोतीपुरा ग्रामीण पोलीस स्टेशन जवार येथून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये आलेली लग्नाची मिरवणूक राजगड जिल्ह्यातील कुलमपुरा गावात येत असताना पिपलोडी चौकीजवळ त्यांची ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात ट्रॉली खाली चिरडून तीन मुले आणि तीन महिलांसह 13 जणांचा मृत्यू झाला. तर 40 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि एसपीही घटनास्थळी पोहोचले आहेत.
अपघातात तीन मुलांसह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना भोपाळला रेफर करण्यात आले आहे. उर्वरितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्रत्यक्षदर्शींवर विश्वास ठेवला तर अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो.
अपघातानंतर स्थानिक लोक मदतीसाठी धावून आले.अपघात होताच तेथे एकच गोंधळ झाला.
ट्रॉलीमध्ये बरेच लोक होते, ते सर्व गाडले गेले. आम्ही प्रयत्न केले पण लोकांना बाहेर काढता आले नाही. नंतर प्रशासनाच्या मदतीने जेसीबी मागवण्यात आली आणि लोकांना बाहेर काढले. दहाहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.
राजस्थानहून ट्रॅक्टर-ट्रॉलीतून काही लग्नाच्या मिरवणुका राजगड जिल्ह्यात येतअसताना ट्रॅक्टर ट्रॉली पालटली आणि 13 जण ठार झाले तर 40 जण जखमी झाले. अपघातानंतर प्रशासनाने काही जखमींना रुग्णवाहिकेने तर काही लोकांना ट्रॅक्टर-ट्रॉलीने रुग्णालयात नेले.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना,लिहिले की, 'मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात झालेल्या अपघातात अनेक लोकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करते आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते .