Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वन रँक वन पेन्शनसाठी लढा मागणीचे आश्वासन पूर्ण न झाल्याने सैनिकाची आत्महत्या

subedar ram kishan
, बुधवार, 2 नोव्हेंबर 2016 (14:26 IST)
चंदीगढ येथील  निवृत्त सैनिकांनी नवी दिल्लीतील जंतर मंतरवर वन रँक वन पेन्शन मिळावी म्हणून आंदोलन केले. त्यावेळी निवृत्त सैनिकांना पेन्शन मिळेल असे  आश्वासन सरकारने  दिले होते. या बाबतीती कोणतीच हालचाल झाली नाही. उलट या मागणीकडे सफसेल  दुर्लक्ष केले. यामध्ये व्यथित झालेल्या आणि देशासाठी सेवा केलेल्या सैनिकाल दुख झाले. यामुळे  वन रँक, वन पेन्शनच्या मुद्यावर निवृत्त सैनिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
 
आत्महत्या केलेल्या निवृत्त सैनिकाचे नाव सुबेदार राम किशन गरेवाल असे आहे. भिवानी जिल्ह्यातील बुमला गावचे रहिवासी आहेत. आपल्या राहत्या घरी विष प्राशन करुन त्यांनी आत्महत्या केली आहे. सुबेदार राम किशन गरेवाल यांना वन रँक वन पेन्शनसंबंधी तक्रार करायची होती. यासाठी त्यांना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घ्यायची होती. मात्र त्यांची भेट घेण्यास नकार देण्यात आल्याने सुबेदार राम किशन गरेवाल यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झालेय.मी  माझ्या  देशासाठी आणि  जनतेसाठी काम केले मात्र उपेक्षा झाली  आहे. तरी सरकारने इतरांचा न्याय करावा अशी मागणी केली आहे. असे चिठ्ठीत लिहिले आहे. त्यामुळे आपल्या देशातील निवृत्त सैनिक कसा जीवन जगतोय आपल्या समोर आले आहे. आता तरी न्याय द्या असे सैनिक संघटनेने मागणी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्रूरकर्मा बापाकडून दोन चिमुकल्यांची हत्या