rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपूरच्या आमदार निवासमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

rape in nagpur
, गुरूवार, 20 एप्रिल 2017 (20:41 IST)
संपूर्ण महाराष्ट्राला लाजवेल अशी धक्कादायक  घटना  नागपूरात घडली आहे.  नागपूरच्या आमदार निवासमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आहे. या लज्जास्पद घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 
 
नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाला असून,  मागील तीन दिवसांपासून या पीडीत मुलीवर अत्याचार सुरु होता अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. 
 
या बलात्कारप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. रजत भद्रे आणि मनोज भगत अशी संशयीत आरोपींची नावे असल्याचे समजते. 
 
आमदार निवासातील तिसऱ्या मजल्यावरील  रुम नंबर 301 मध्ये ही घटना घडली आहे. 
 
संशयीत आरोपींपैकी मनोज भगत याच्या ज्वेलर्सच्या दुकानात ही पीडीत मुलगी काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आर्थिक घोटाळेबाज फडणीस एखेर अटक कोट्यवधींची फसवणूक