Publish Date: Thu, 05 Jan 2017 (16:23 IST)
Updated Date: Thu, 05 Jan 2017 (16:35 IST)
राजधानी दिल्लीत जुन्या नोटांवरुन मोठा आणि धक्का दायक असा गोंधळ पाहायला मिळाला आहे . एका बँकेने महिलेला जुन्या नोटा बदलून न दिल्याने तिने चक्क कपडे उतरवून बँकेचा निषेध केला आहे. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. यामध्ये झाले असे की, महिला रिझर्व्ह बँकेत नोटा बदलण्यासाठी आली होती, मात्र बँकेने तिला 4 हजाराच्या जुन्या नोटा बदलून देण्यास साफ नकार दिला आहे. मात्र असे झाल्याने त्या महिलेचा संताप अनावर झाला आहे.तिने लगेच यामुळे महिलेने चक्क रिझर्व्ह बँकेसमोर कपडे उतरवले आणि निषेध व्यक्त केला.यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. परदेशातून आलेल्यांना आणि अनिवासी भारतीयांना जुन्या नोटा बदलून दिल्या जातील, अशी घोषणा रिझर्व्ह बँकेनं केली आहे.
webdunia
Publish Date: Thu, 05 Jan 2017 (16:23 IST)
Updated Date: Thu, 05 Jan 2017 (16:35 IST)