बीएसएफ जवान सीमेपलिकडून तस्करी होत असलेल्या नोटा पकडतात तेव्हा त्यांना भारतीय चलनातील नोटांची सत्यता पडताळण्यासाठी रिझर्व बॅंकेशी वारंवार संपर्क साधावा लागतो. या प्रक्रियेसाठी बराच अवधी लागत असल्यामुळे बीएसएफ जवानांना बनावट आणि खऱ्या नोटा ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे अशी विनंती बीएसएफमार्फत आरबीआयला करण्यात आली आहे.पाकिस्तानातून बांगलादेश मार्गे दोन हजार रूपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात भारतात येत आहेत. अलीकडेच तीन ते चार वेळा भारतात अशा नोटा पाठवल्या जात असताना बीएसएफ जवानांनी पकडल्या आहेत. त्यामुळेच रिझर्व बॅंकेने बनावट नोटांच्या तपासणीसाठी जवानांना प्रशिक्षित करावे अशी मागणी पुढे आली आहे.