Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 30 March 2025
webdunia

'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर दिल्ली मध्ये राडा

chhava movie delhi
, रविवार, 23 फेब्रुवारी 2025 (14:36 IST)
social media
‘छावा’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्यातच 200 कोटींचा टप्पा ओलांडला. 
‘छावा’ चित्रपटात विकी कौशलने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची भूमिकाविकी कौशलच्या 'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. लोकांना हा चित्रपट खुप आवडला असून प्रेक्षकांची दाद चित्रपटाला मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. '
दिल्लीत छावा चित्रपट पाहिल्यानंतर दिल्लीतील काही संतप्त लोकांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. बाबर रोडच्या साइनबोर्डला काळे फैसले असून दिल्लीतील अकबर, बाबर आणि हुमायू रोडचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. कारण अकबर, बाबर आणि हुमायू यांनी छत्रपति शिवाजी महाराजांवर अन्याय केला होता.

काही तरुणांनी रस्त्यावर जोरदार निदर्शने केली.रस्त्यांची नावे बदलण्याची या आंदोलकांनी केली आहे. या वेळी तरुणांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. रस्त्यावर बराच वेळ गोंधळ सुरु होता. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला असून सीसीटीव्ही फुटेज वरुन चौकशी केली जात आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 
या व्हिडिओ मध्ये काही लोक साइनबोर्डवर काळी काजळी लावत आहे आणि साइन बोर्डावर छत्रपति शिवाजी महाराज मार्ग असा फोटो चिटकवटाना दिसत आहे. 

पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर पोलिस पथके आणि महानगर पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि काजळी लावलेले बोर्ड स्वच्छ केले. अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला असून दोषींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पोलिस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. 
Edited By - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: सिंधुदुर्गात पुण्यातील पाच पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू