Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Narendra Modi - पंतप्रधान मोदी यांच्या मर्डरसाठी 50 कोटी रुपयांचा ऑफर

Narendra Modi - पंतप्रधान मोदी यांच्या मर्डरसाठी 50 कोटी रुपयांचा ऑफर
, सोमवार, 22 मे 2017 (13:33 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी सुन्नी दहशतवाद्यांच्या निशाण्यांवर आहेत. मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्या निवासी कुशल सोनी जवळ अनोळख्या नंबराहून विदेशातून कॉल आला होता, ज्यात 25 मे मध्ये मुंबईत होणार्‍या रॅलीच्या दरम्यान पंतप्रधान मोदी यांना बॉम्बने उडवण्यासाठी 50 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. कुशल सोनी ने या प्रकरणाची लिखित तक्रार पोलिस स्टेशनात केली आहे. यावर पोलिसांनी केस दर्ज करून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.  
 
या अगोदर मध्यप्रदेश इंटेलिजेंस ने युपी पोलिसांना अलर्ट केले होते की दहशतवादी भगवा वेषामध्ये उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथावर हल्ला करण्याच्या फिरकीत आहे. सतना पोलिस अधीक्षक मिथिलेश शुक्ला यांनी सांगितले की पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. सायबर सेल याची चाचणी करत आहे. त्यांनी सांगितले की संध्याकाळी 4.50 मिनिटाने सतनाच्या रामनगर निवासी कुशल सोनी यांच्याजवळ एक कॉल आला होता. 
 
कॉल करणार्‍या व्यक्तीने सांगितले की 25 मे रोजी मुंबईमध्ये होणार्‍या रॅलीमध्ये री मोदी यांना बॉम्बने उडवायचे आहे. त्यांनी पुढे ही म्हटले की या वारदातीसाठी दोन बंदे तयार आहे. फोन करणार्‍या व्यक्तीने कुशल यांना सांगितले की वारदातीत तुम्ही देखील सामील होऊन जा. त्यासाठी तुम्हाला भक्कम रक्कम देण्यात येईल. पण फोन करणार्‍याने  आपले नाव सांगितले नाही. 
 
वृत्तानुसार कुशल यांना वाटले की कोणी मजाक करत आहे, पण मोबाईल नंबर बघितल्यानंतर त्यांचे होश उडून गेले. त्यांनी याची तक्रार रामनगर ठाण्यात केली आणि ऑडिओ पोलिसांना दिला. रामनगर थाना प्रभारी केएल मिश्रा यांनी सांगितले की हा फोन विदेशातून आला होता. फोन करणार्‍या व्यक्तीचा टोन गुजराती वाटत आहे. महत्त्वाचे म्हणजे सतनाच्या बलराम आणि राजीव नावाच्या दोन पाकिस्तानी गुप्तचरांना भोपाळ एसटीएफने अटक केले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्रम्प-नवाज भेट घडवून द्या!