Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सचिन पायलट काँग्रेसमध्येच राहणार

सचिन पायलट काँग्रेसमध्येच राहणार
, मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (10:21 IST)
राजस्थानमध्ये बंडाचा झेंडा उभा करणारे सचिन पायलट यांची घरवापसी झाली आहे. ते काँग्रेसमध्येच राहणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्ष आणि सरकारला साथ देणार असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्षातर्फे सचिन पायलट यांचं बंड शमल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पीटीआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. सचिन पायलट यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती.

राजस्थानात उद्भवलेल्या सत्ता संघर्षानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे गेहलोत-पायलट वादावर पडदा पडण्याबरोबरच राजस्थानातील सत्ता संघर्ष लवकरच मिटण्याची शक्यता होती. त्या अपेक्षेप्रमाणेच सचिन पायलट यांनी पक्षासाठी काम करण्याचं मान्य केलंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोकणात जाणाऱ्यांना कोविड- 19 ची चाचणी करणे अनिवार्य