Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साध्वीचा गोळीबार, एक ठार पाच जखमी

करनाल
करनाल (हरयाणा)- करनाल येथे एका विवाह सोहळ्यात 'डीजे'वर वाजणारे गाणे न आवडल्याने साध्वी देवा ठाकुर व त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली असून या गोळीबारात वरच्या मावशीचा मृत्यू झाला आहे पार वर्‍हाडी जखमी झाले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, साध्वी देवा ठाकुर या ‍विशेष निमंत्रित म्हणून लग्नाला आल्या होत्या. मात्र, विवाह समारंभात डीजे वर लागलेल्या एका गाण्याने साध्वी संतप्त झाल्या. रागाच्या भरातच त्यांनी गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनीही गोळीबार केला.
 
या गोळीबारात वरच्या मावशीला प्राण गमावले लागले तर अन्य पाच जण जखमी झाले. या घटनेचा एक व्हिडिओही पुढे आला असून साध्वी आणि त्यांचे सुरक्षा रक्षक बिनधास्तपणे गोळीबार करताना दिसत आहेत. साध्वी देवा याआधीही अनेक चर्चेत राहिल्या आहेत. परदेशात भटकंती, सोन्याचे दागिने आणि बंदूक बाळगण्याचा त्यांचा छंद आहे. देवा फाउंडेशनच्या त्या अध्यक्षा असून करनालमधील ब्रास गावात त्यांचा आश्रम आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशातील सर्वाधिक प्रिय 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ संगीत प्रेमीना सर्वात मोठी पर्वणी