गेल्या एक महिन्यात आणि नोटबंदीच्या निर्णयानंतर शिर्डीच्या साई चरणी तब्बल 17 कोटी 43 लाखांच दान अपर्ण झाले आहे. हे दान दानपेटी, ऑनलाईन, देणगी काऊंटरवर, त्याचसोबत डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळाले आहे. यामध्ये जुन्या नोटाही मोठ्या प्रमाणात असून नवीन नोटा सुद्धा आहे.
– दानपेटी – 10 कोटी रुपये
– ऑनलाईन देणगी – 97 लाख 17 हजार
– देणगी काऊंटर – 1 कोटी 65 लाख
– चेक डीडी – 2 कोटी रुपये
– डेबिट व क्रेडिट कार्ड – 1 कोटी 20 लाख रुपये
– प्रसादालयात देणगी – 6 लाख रुपये
याशिवाय महिनाभरात व्हीआयपी दर्शन पासच्या माध्यमातून तब्बल एक कोटी रुपये संस्थानला दान स्वरुपात मिळाले. दानपेटीत 1 हजार रुपयांच्या 17 हजार 374 नोटा, 500 रुपयांच्या 39 हजार 472 नोटा मिळाल्या आहेत, तर नवीन चलनात आलेल्या 2000 रुपयांच्या 5 हजार 283 नोटांचाही दानात समावेश आहे.