Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 15 April 2025
webdunia

500 रुपयात तुरुंगाची सैर (Video)

Sangareddy Jail Telangana
तुरुंग हा शब्द ऐकल्यावर लोकं जरा घाबरतात. डोळ्यासमोर अंधारी कोठडी, अर्धवट शिजलेलं जेवण, पोलिसांची मार आणि जवळपास खूंखार कैदी असं चित्र फिरू लागतं. तसं तर गुन्हा केल्यावर तुरुंगाचे दर्शन होतात पण तुम्हाला कोणताही गुन्हा न करता तुरुंग बघण्याची इच्छा असेल तर हे अनुभव आपण फक्त 500 रुपयात घेऊ शकता. 
 
एका दिवसासाठी कैदी बनून राहण्याची इच्छा असल्यास तेलंगणा राज्याच्या जेल प्रशासनाचा आगळा-वेगळा फील द जेल या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. या पॅकेजमध्ये 24 तास तुरुंगात राहून कैद्याचे जीवन कसं असतं हा अनुभव घेता येऊ शकतो.
 
तेलंगणाच्या मेडक जिल्ह्याच्या संगारेड्डी येथील 220 वर्ष जुनी जिल्हा सेंट्रल जेल आता म्युझियम म्हणून दर्शकांसाठी उघडलेली आहे. यात येणार्‍या पर्यटकांना संध्याकाळी 5 वाजता बंद केलं जातं आणि सकाळी 5 वाजता सोडण्यात येतं. कैदी बनलेल्या पर्यटकांना तेच जेवायला मिळतं जे सामन्यात इतर जेलमधील कैदी खातात. जेल प्रशासनाकडून खादी ने तयार वर्दी, ताट, ग्लास, मग, टॉयलेट सोप आणि कपडे धुवायचा साबणदेखील देण्यात येतो. येथील स्वच्छतादेखील कैद्यांनाच करावी लागते. अर्थातच आता आपण गुन्हा केला नसला तरी तुरुंगातील सैर मात्र नक्कीच करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जास्त फोटो पोस्ट करणे असू शकते नैराश्याचे लक्षण