Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजप खासदार सांवरलाल जाट यांचे निधन

भाजप खासदार सांवरलाल जाट यांचे निधन
, बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (13:15 IST)
मोदी सरकारमधील जलसंधारण राज्यमंत्री आणि अजमेरचे भाजपचे खासदार सांवरलाल जाट यांचं दिल्लीत निधन झालं. मागच्या महिन्यात २२ जुलैला राजस्थानची राजधानी जयपुरमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कार्यक्रमात सांवरलाल जाट बेशुद्ध होऊन पडले होते. त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सांवरलाल जाट अजमेरमधून लोकसभा खासदार आहे. ते मोदी सरकारमध्ये जलसंधारण राज्य मंत्री देखील होते. ९ नोव्हेंबर २०१४ ते 5 जुलै २०१६ पर्यंत ते जलसंधारण राज्य मंत्री होते. सांवरलाल यांच्या जन्म १९५५ मध्ये गोपालपुरा गावात झाला होता. १९९३, २००३ आणि २०१३ मध्ये ते राजस्थान सरकारमध्ये देखील मंत्री होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेसचे अहमद पटेल अवघ्या अर्ध्या मताने विजय