एक रूपयांच्या नाण्यांचे काही वेळासाठी का होईना पण वाराणसीत अच्छे दिन आले. फक्त 1 रूपयात साडी खरेदी करण्याची स्कीम शहरातील महमूरगंज येथे एका दुकानमालकाने काढली असून साड्या खरेदी करण्यासाठी महिला अक्षरक्ष: तुटून पडल्या.
दुकानात झुंबड उडाल्यामुळे पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती. शेवटी साडी खरेदी करण्यासाठी रांगेत उभे राहण्याची वेळ महिलांवर आली. पाहता-पाहता रांग थेट रस्त्यावर जाऊन पोहोचली अन् वाहतुकीची कोंडी झाली. अखेर पोलिसांना घटनास्थळी दाखल होऊन गर्दी पांगवावी लागली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून दुकारनदारला नाईलाजाने स्कीम बंद करावी लागली.
अगोदर पाचशे रूपयांची खरेदी केल्यानंतर मग एक रूपयात एक साडी खरेदी करता येणार, अशी ही स्कमी होती. पण दुकारनदाराने जाहिरात करताना अवघ्या एका रूपयात साडी अशी जाहिरात केली अन् प्रचंड गोंधळ उडाला.