Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सामान्य नागरिकांची व्यथा एसबीआयला विनंती माल्या प्रमाणे कर्ज माफी द्या

सामान्य नागरिकांची व्यथा एसबीआयला विनंती माल्या प्रमाणे कर्ज माफी द्या
, शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 (12:33 IST)
देशातील पहिली घटना 
कर्जबुडव्या असलेल्या आणि फरारी विजय माल्या याच्या कर्ज माफी प्रकरण चांगलेच तापले आहे. असाच काहीच प्रकरण नाशिक मध्ये समोर आला आहे.मात्र त्यावर आता एका सामान्य कर्जदार असलेल्या नागरिकाने SBI सविनय अर्ज केला आहे. तर कर्ज अमाफ करावे अशी विनंती केली आहे.स्टेट बँक ऑफ इंडियानं उद्योगपती विजय मल्ल्या यांचं 1200 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं.भाऊराव सिताराम सोनवणे असे या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. माल्या साठी जे धोरण होते तेच धोरण ठेवावे आणि मला कर्ज मुक्ती द्यावे असे त्यांचे म्हणने आहे.भाऊराव सोनवणे यांनी आपल्या मुलाच्या आजारपणासाठी तीन वर्षांच्या मुदतीवर 1.5 लाख रुपयांचे कर्ज स्टेट बँकेकडून कर्ज घेतले होते.
 
या पत्रात त्यांनी भारतीय स्टेट बॅंकेने उद्योगपती विजय मल्या यांचे 1201 कोटी रूपयांचे कर्ज माफ केले. ज्या अर्थी आपली बॅंक मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करते, त्याच प्रमाणे माझे 1.5 लाख रुपयांचे वैयक्तीक कर्ज त्याच धोरणानुसार माफ करावे, ही विनंती करण्यात आली आहे. सरकारचा उद्योगपतींना कर्जमाफी देण्याचा निर्णय आता सामान्यांना लागु करावा अशी टिप्पणी त्यावर होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सत्ताधार्‍यांकडून जनतेच्या पैशांची लूट केली जात आहे - सुनिल तटकरे