Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता RO वॉटरने महादेवाला अभिषेक: सुप्रीम कोर्ट

आता RO वॉटरने महादेवाला अभिषेक: सुप्रीम कोर्ट
उज्जैन- उज्जैन स्थित महाकाल ज्योतिर्लिंगाचे झीजेला सुप्रीम कोर्टाने सकारात्मक टिप्पणी करत काही निर्देशही दिले आहेत. कोर्टाने स्वीकारले की मंदिर प्रबंधन झीज रोखण्यासाठी करत असलेले उपाय संतोषजनक आहे. तसेच न्यायालयाने जलाभिषेक आणि दुग्धाभिषेककबद्दलही निर्देश दिले आहेत. याची पुढील सुनावणी 30 नोव्हेंबर रोजी होईल.
 
उल्लेखनीय आहे की महाकाल शिवलिंगच्या ‍झीजेसाठीसाठी दाखल याचिकेवर निरंतर काम चालू आहे. सुप्रीम कोर्टाने अलीकडेच पुरातत्त्व विभाग, भूगर्भीय आणि इतर तज्ज्ञांच्या टीमसोबत महाकालचा दौरा करत शिवलिंग, पाणी, फूल, दुधासह सर्व माहिती गोळा केली होती. या टीमने सांगितले होते की पूजा दरम्यान शिवलिंगावर अर्पित करण्यात येणार्‍या काही वस्तूंमुळे पिंडीला नुकसान होत आहेत ज्यात कुंडातील पाणीदेखील सामील आहे.
 
RO वॉटरने होणार अभिषेक
सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले की आता महाकाल ज्योतिर्लिंगावर जलाभिषेक केवळ RO वॉटरने केला जाईल. यासाठी पाण्याची मात्रादेखील ठरवण्यात आली आहे. आता भक्त आपल्यासोबत केवळ अर्धा लीटर पाणी घेऊन जाऊ शकतो. याव्यतिरिक्त दुग्धाभिषेकासाठी सुप्रीम कोर्टाने 1.25 लीटरची मात्रा ठरवण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हरभजन सिंहने केली चिमुरडीला मदत